निव्वळ जातीय दंगलींमुळे खानदेश जमातवादाचे नवे केंद्र बनले असे नव्हे, तर मागास-शोषित जनमानसाच्या असंतोषाचा ताबा अनेक आघाड्यांवर जमातवादी शक्तींनी घेतल्याने ही प्रक्रिया घडली आहे
मालेगांव हे २००८ पूर्वी दंगलींचे केंद्र मानले जाई. तेथील मुस्लीम जनसंख्येच्या असंतोषाला जातीय वळण देऊन दंगली घडवल्या जात. मात्र २००८ मध्ये झालेली धुळे दंगल, त्यानंतर नंदुरबार दंगल (२०११) आणि २०१३ मध्ये धुळ्यात पुन्हा झालेली दंगल या घटनांनी खानदेश हे जमातवादाचे नवे केंद्र म्हणून पुढे आले. मागास-शोषित जनमानसाच्या असंतोषाचा ताबा अनेक आघाड्यांवर जमातवादी शक्तींनी घेतल्याने ही प्रक्रिया घडली आहे.......